कृष्णपुरीतील जगदीश पिराजी पाटील यांची सलग दुसऱ्यांदा पाचोरा भाजपाच्या शहर सरचिटणीस पदी निवड

पाचोरा, दि. ०९ ऑगस्ट २०२५: भारतीय जनता पक्षाच्या पाचोरा मंडल कार्यकारिणीत कृष्णापुरी भागातील भाजपा नेते अमोल भाऊ शिंदे यांचे समर्थक जगदीश पिराजी पाटील यांची सलग दुसऱ्यांदा पाचोरा शहर सरचिटणीस पदी निवड झाली आहे. ही निवड मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा.आ.श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार आणि मा.ना.श्री. गिरीशभाऊ महाजन, खासदार स्मिताताई वाघ, मा.श्री.आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष श्री.डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मान्यतेने पाचोरा-भडगाव विधानसभेचे निवडणूक प्रमुख अमोलभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वात मंडल अध्यक्ष श्री. दीपक पांडुरंग माने यांनी जाहीर केली आहे.जगदीश पाटील यांच्या या निवडीमुळे पाचोरा शहरातील भाजपाच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.




