नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
ताज्या बातम्याराजकारणशैक्षणिक

पाचोरा-भडगाव रोटरी क्लबतर्फे मूकबधिर विद्यालयात वृक्षारोपण व सामाजिक उपक्रम उत्साहात साजरे


Advertisements
Ad 4

पिंपळगाव हरे, दि. 15 ऑगस्ट 2025: रोटरी क्लब पाचोरा-भडगाव यांच्या वतीने माजी विद्यार्थी संघ, पिंपळगाव हरे संचलित मूकबधिर निवासी विद्यालयात 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांच्या शुभहस्ते जवळपास 200 झाडांचे रोपण करण्यात आले.

या प्रसंगी रोटरीच्या सामाजिक इंटरॅक्ट क्लब उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट्सचे वाटप करण्यात आले. तसेच, पारस ग्रामीण पतसंस्था, शेंदुर्णी यांच्याकडून प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश देण्यात आले. वरखेडी येथील श्री. राजेंद्र काशिनाथ कानडे यांनी विद्यार्थ्यांसाठी मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था केली, तर श्री. वसंत माळी, श्री. विठ्ठल गीते, श्री. अर्जुन गीते, श्री. दौलत साहेब आणि श्री. शामराव महाजन यांनी खाऊचे वाटप केले.

कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, सचिव डॉ. अजय सिंग परदेशी, रोटेरियन डॉ. कुणाल पाटील, डॉ. प्रशांत सांगडे, श्री. संजय कोतकर, श्री. मनोज केसवानी, श्री. चंद्रकांत लोढाया, श्री. भरत सिनकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक श्री. छोटू सोनवणे, श्री. भगवान पाटील, श्री. अर्जुन गीते, श्री. शामराव महाजन, श्री. देविदास पाटील, श्री. विठ्ठल बडगुजर, श्री. रमेश उभाळे, श्री. रमेश चौधरी, श्री. रघुनाथ पाटील, श्री. ईश्वर पाटील, श्री. विनोद महाजन, पत्रकार श्री. किशोर लोहार, श्री. राजेंद्र ठाकूर यांची उपस्थिती होती.

संस्थेचे पदाधिकारी श्री. पी. बी. पाटील, श्री. एस. एस. पाटील, श्री. दिलीप देशमुख, श्री. संजय पाटील, श्री. रुपेश बडगुजर, माजी मुख्याध्यापक श्री. विश्वनाथ चौधरी, श्री. सुरेंद्र देशमुख, श्रीमती प्रतिभा वाघ, मुख्याध्यापक श्री. ईश्वर पाटील, श्री. नितीन पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गोविंद महाजन यांनी सर्वांचे आभार मानले. विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button