जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोरा:दुसखेडा येथील माजी सरपंच शशिकांत महाजन यांचा वाढदिवस आ. किशोर पाटील यांच्या उपस्थितीत साजरा; मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना क्रिकेट किट व खेळ साहित्य वाटप

- परधाड्याचे सरपंच सचिन पाटील यांच्या दिवंगत मुलाची आठवण म्हणून मूकबधिर विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्ताने मैदानी खेळाचे साहित्य वाटप!
- पाचोरा: दुसखेडा (ता. पाचोरा) येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या निकटवर्तीय शशिकांत महाजन यांचा वाढदिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत एका सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गतवर्षी पारधाडे येथील सरपंच सचिन पाटील यांच्या लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच्या स्मृतीनिमित्त आ. किशोर आप्पा पाटील यांच्या संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना क्रिकेट किट तसेच खेळण्याचे साहित्य वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे मूकबधिर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला असून, त्यांचा उत्साह गगनात मावेनासा झाला. यावेळी कुरंगी बांबरुड गटातील सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार किशोर पाटील यांनी या उपक्रमासाठी सहभागी दात्यांचे आभार मानले आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा उपक्रमांना पाठबळ देण्याचे आवाहन केले.हा कार्यक्रम सामाजिक संवेदनशीलता आणि एकत्रीकरणाचे उत्तम उदाहरण ठरला असून, उपस्थितांनी या कार्याचे कौतुक केले.



