जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणशैक्षणिक
पाचोरा एम. एम. कॉलेजतर्फे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल येवले यांचा सत्कार

पाचोरा, दि. 28 ऑगस्ट 2025: पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या एम. एम. कॉलेजतर्फे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेच्या आमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभात संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री. विठ्ठल (नाना) जोशी यांच्या हस्ते येवले यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाला कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनिल येवले यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.






