जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारण
खेडगाव नंदीचे येथील ग्रामसेवक राजेंद्र पंडित पाटील यांचा आमदार किशोर पाटील यांच्याकडून सत्कार!

खेडगाव नंदीचे ता.पाचोरा |दिनांक २८ ऑगस्ट २०२५: खेडगाव नंदीचे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक श्री. राजेंद्र पंडित पाटील (वेरूळीकर) यांनी ३१ वर्षे प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि निष्ठेने शासकीय सेवा बजावल्यानंतर दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी नियत वयोमानाने निवृत्त होत आहेत. त्यांच्या या समर्पित सेवेचा गौरव म्हणून तालुक्याचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी खेडगाव नंदीचे सरपंच श्री. प्रदीप पाटील (अण्णा) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ग्रामसेवक पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या प्रामाणिकपणा आणि गावाच्या विकासासाठी केलेल्या योगदानाचे कौतुक केले.