नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्यसंपादकीय

शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी भरपाईतील कोट्यवधीचा घोटाळा करणाऱ्या कर्मचारी अमोल भोईवर गुन्हा दाखल! तहसीलदारांची पोलिसांत तक्रार,तपास सुरू…. जिल्हाधिकारी कार्यालयाला निलंबनाचा प्रस्ताव दाखल.


Advertisements
Ad 4

पाचोरा, ३१ ऑगस्ट, २०२५: पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्ती निधीच्या वाटपात ₹१.२० कोटींहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तहसीलदार विजय शिवाजी बनसोडे यांनी पाचोरा येथील तत्कालीन महसूल सहायक अमोल सुरेश भोई आणि एका मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी शिकाऊ व्यक्ती यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, भोई यांच्याकडे शेती पिकांच्या नुकसानीसाठी अनुदान वितरणाची माहिती गोळा करून ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्याची जबाबदारी होती. तपासणीत असे आढळले की, तहसीलदारांचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून अपात्र लाभार्थ्यांची नावे आणि बँक खाते क्रमांक अपलोड केले गेले. तालुक्यातील वडगाव आंबे, वडगाव आंबे बु., वडगाव आंबे खु., वडगाव जोगे, कोकडी, पिंपळगाव आणि लोहारा या सात गावांमध्ये २२५ अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ₹८३,७३,५५२/- जमा झाले. यापैकी १२२ लाभार्थ्यांनी २०२२ मध्येही अनुदान घेतल्याचे उघड झाले आहे. शिवाय, १२३ पैकी १२२ जणांची नावे आणि गट क्रमांक ऑनलाइन ७/१२ उताऱ्यांशी जुळत नसल्याचे निष्पन्न झाले.

सुरुवातीला भोई यांनी ही चूक ‘कॉपी-पेस्ट’मुळे झाल्याचा दावा करत नुकसान भरपाई आणि कारवाई न करण्याची विनंती केली होती. तसेच, वडगाव आंबे येथील ४२ लोकांच्या खात्यात चुकीने जमा झालेली रक्कम वसूल करण्याचे आश्वासन दिले. मात्र, १४ ऑगस्ट, २०२५ रोजी नेमलेल्या समितीच्या तपासणीत हा मोठा गैरव्यवहार उघड झाला. एकूण ₹१,२०,१३,५१७/- चा गैरव्यवहार २०२२-२३ आणि २०२४-२५ या कालावधीत झाल्याचा संशय आहे.

या प्रकरणात भोई यांनी WhatsApp ग्रुपवर शेअर केलेली यादी डिलीट करण्यास सांगितले आणि चुकीची नावे व आधार क्रमांक काढून यादी पुन्हा शेअर केली. तहसीलदारांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, भोई यांच्या निलंबनाचा आणि विभागीय चौकशीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.

पोलिसांनी तपास सुरू केला असून, या प्रकरणी पुढील कारवाई अपेक्षित आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button