चाळीसगावची कन्या कु. मानसी पाटील हिची विज्ञान क्षेत्रात दमदार कामगिरी; अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात यश

चाळीसगाव, दि. ७ सप्टेंबर २०२५: चाळीसगावच्या गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थिनी कु. मानसी प्रकाश पाटील हिने भारत सरकार आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश मिळवून शहराचा आणि जळगाव जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.
मानसीने तालुका स्तरावरील विज्ञान मेळाव्यात द्वितीय क्रमांक पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली. यानंतर जळगाव जिल्हा स्तरावरही तिने द्वितीय क्रमांक मिळवला. या यशस्वी कामगिरीमुळे तिची विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे. मानसीच्या या यशाने चाळीसगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
या यशाबद्दल गुरुकुल स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक आणि चाळीसगावातील नागरिकांनी मानसीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तसेच, भविष्यात विज्ञान क्षेत्रात मोठी भरारी घेऊन देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
मानसीच्या या यशाने चाळीसगावच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा निर्माण झाली असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून कौतुक आणि शुभकामना व्यक्त होत आहेत.






