पाचोऱ्यात साई गणेश मित्र मंडळाची आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते आरती संपन्न! भर पावसात भक्तांची उत्साहपूर्ण उपस्थिती

पाचोरा, दि. ६ सप्टेंबर २०२५: पंपिंग रोडवरील साई गणेश नगर येथील साई गणेश मित्र मंडळ आयोजित गणेश आरती सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याला मा. आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी श्रीगणेशाची आरती करून उपस्थित भक्तांना शुभेच्छा दिल्या.
सोहळ्यास उपजिल्हा प्रमुख किशोरआप्पा बारवकर, पाचोरा शहर प्रमुख सुमितआबा सावंत, निलेशभाऊ मराठे, हेमंतभाऊ चौधरी, मंडळाचे अध्यक्ष विजय भोई, उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, खजिनदार गोलू सूर्यवंशी, प्रदीपबापू भास्कर पाटील, भुवनेशभाऊ दुसाने, आबा (बजरंग) चौधरी, भरतभाई भैरु, सुमितभाऊ चौधरी, सचिन सिहाले यांच्यासह गोकुळभाऊ पाटील, संजय राजगुरे, हिरालाल परदेशी, जगदीश सोनवणे, चंद्रकांत पाटील, रोहिदास आदिवाल, सोपान पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
भक्तीमय वातावरणात महिलांची उत्स्फूर्त सहभाग
पंपिंग रोड परिसरातील अलका भोई, कविता चौधरी, चित्रा सोनार, प्रतिभा पाटील, छाया पाटील, ज्योती मिस्तरी, मनीषा कोळी, अनिता खेडकर, लक्ष्मी सँडर्स, सुरेखाबाई महाजन, सोनल पाटील, कोमल महाजन, अल्काबाई शिंदे, मोनाली महाजन, शांताबाई, शीतल तिवारी, सपना साठोड, सरलाबाई, अर्चनाबाई, दिपलाबाई परदेशी, गायत्रीबाई पाटील, राजगुरु मॅडम, सीमा मराठे, महाजन ताई यांच्यासह अनेक माता-भगिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यांच्या सहभागाने संपूर्ण वातावरण भक्तीमय आणि प्रेरणादायी बनले.
मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान
कुणाल चौधरी, जितेंद्र सूर्यवंशी, गणेश शिंदे, संदीप सोनवणे, विकी सूर्यवंशी, साई भोई, अनिल महाजन, दिपक चौधरी, चंद्रकांत पाटील, मुन्ना शिंदे, रोहिदास आदिवाल, जितेंद्र पाटील, अनिल पाटील, रवींद्र पाटील, किरण महाजन, दिपक बडगुजर, शांतू पाटील, प्रियांश पाटील, मयूर खेडकर, चंद्रकांत अहिरे, यश अहिरे, जॉन नोवेल यांनी आरती आयोजनात मोलाची भूमिका बजावली.
आमदार पाटील यांचे आभार आणि आश्वासन
मा. आमदार किशोर पाटील यांनी उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत भर पावसात उपस्थित सर्व भक्तांचे आभार मानले. तसेच, पंपिंग रोड परिसरात भविष्यात भूमिगत गटारी, रस्ते आणि पथदिव्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली. त्यांनी आरतीचा मान दिल्याबद्दल मंडळाचेही आभार मानले.
हा सोहळा पाचोरा शहरातील भक्ती आणि एकतेचे प्रतीक ठरला, ज्यामुळे सर्व उपस्थितांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.