जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारण
पाचोर्यातील नामवंत व्यवसायिक भुवनेश दुसाने यांचा शिवसेनेत प्रवेश

दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी पाचोरा शहरातील पंपिंग रोड परिसरात रहिवासी असलेले पत्रकार तथा व्यवसायिक भुवनेश दुसाने यांनी पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर त्याचबरोबर शिवसेना पाचोरा शहर प्रमुख सुमित सावंत यांच्याबरोबरच आधी कार्यकर्ते उपस्थित होते. गिरणा पंपिंग परिसरात नव्या पिढीला संधी द्यावी या हेतूने अनेक होतकरू तरुणांचा येणाऱ्या कालखंडामध्ये शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश होईल असे देखील यावेळी भुवनेश दुसाने यांनी सांगितले आहे.






