लासुरे गावात 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते किरण देवरे यांना ध्वज रोहणाचा मान

लासुरे, दि. 15 ऑगस्ट 2025: देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लासुरे गावात सामाजिक कार्यकर्ते किरण देवरे यांना ध्वज रोहणाचा सन्मान देण्यात आला. या सोहळ्यास सरपंच रेखाबाई किशोर देवरे, उपसरपंच सागर प्रेमराज देवरे, पोलिस पाटील संजय धोडू बारी, तंटामुक्ती अध्यक्ष भैय्यासाहेब दयाराम देवरे, ग्रामपंचायत सदस्य सविता प्रकाश देवरे, वैशाली किरण देवरे, कासम तुराब तडवी, आशाबाई सकीदर तडवी, पंचमंडळ अध्यक्ष यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण, माय-माऊली आणि जिल्हा परिषद शाळा लासुरे व अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळेतही ध्वजवंदनाचा मान देण्यात आला. या प्रसंगी गावकऱ्यांनी एकत्र येऊन स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. देशभक्तीपर गीतं, भाषणं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरण प्राप्त झाले. गावातील एकजुटीने आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.