पाचोरा येथील हरिभाऊ पाटील यांची माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून नियुक्ती

पाचोरा: माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनने पाचोरा येथील रहिवासी हरिभाऊ तुकाराम पाटील यांची ‘माहिती अधिकार कार्यकर्ता’ म्हणून नियुक्ती केली आहे. १२ सप्टेंबर, २०२५ पासून ही नियुक्ती लागू झाली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी यासंदर्भात हरिभाऊ पाटील यांना नियुक्तीपत्र दिले. या पत्रानुसार, पाटील यांची पाचोरा तालुक्याच्या सक्रिय सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद मानद स्वरूपाचे असून त्यांना भारतीय संविधान, भारतीय कायदे आणि फेडरेशनच्या आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या नियुक्तीनंतर, हरिभाऊ पाटील यांना माहिती अधिकार अधिनियम २००५ चा वापर व्यापक जनहितासाठी करावा, तसेच या कायद्याचा सर्वसामान्य नागरिकांमध्ये आणि समाजात प्रसार व प्रचार करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
याबद्दल अधिक माहिती देताना, श्री. बसवेकर यांनी हरिभाऊ पाटील यांचे अभिनंदन केले आणि त्यांना त्यांच्या नव्या भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या. हरिभाऊ पाटील यांच्या या निवडीमुळे पाचोरा तालुक्यात माहिती अधिकाराच्या वापराला गती मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.