आमदार किशोर पाटील यांचे कट्टर समर्थक सागर पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पाचोरा: शहरातील संत गाडगेबाबा नगर येथील रहिवासी आणि आमदार किशोर आप्पा पाटील यांचे कट्टर समर्थक, युवासेनेचे माजी शहरचिटणीस आणि जागर युवा फाउंडेशनचे अध्यक्ष सागर पाटील यांचा वाढदिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मागील काही वर्षांपासून सागर पाटील यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी गरजू लोकांना अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. तसेच, शिवसेनेच्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.राजकीय क्षेत्रात आमदार किशोर पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी आपल्या वार्डातील आणि शहरातील अनेक लोकांचे प्रश्न आमदार आप्पासाहेब यांच्या माध्यमातून सोडवले आहेत. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी सामाजिक कार्यावर भर दिला. त्यांच्या जागर युवा फाउंडेशनमार्फत अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात. याच माध्यमातून त्यांनी वार्डातील महिलांना आमदार आप्पासाहेबांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळवून दिला. तसेच, बांधकाम कामगारांना पेटी आणि भांडी वाटप करून त्यांना मदत केली. सागर पाटील यांच्या या सामाजिक कार्यामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी जेष्ठ पत्रकार अनिल येवले,मधुर खान्देशचे मुख्य संपादक राहुल महाजन तसेच आरोग्य सेवक नितीन तायडे व सामाजिक कार्यकर्ते भोला पाटील उपस्थित होते.