पाचोरा तालुक्यातील 132 केव्ही पॉवर हाऊस पासून पहाण मोहाडी गावा पर्यंत वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त

पाचोरा, दि. 22 मे 2025: पाचोरा येथील 132 केव्ही सबस्टेशनमधून वडगाव ते पहाण मोहाडीपर्यंतच्या 50 वर्षांपेक्षा जुन्या 11 केव्ही विद्युत लाईनमुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. या समस्येमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, त्यांनी जुन्या विद्युत तारांचे नूतनीकरण आणि दुरुस्तीची मागणी केली आहे.
नागरिकांनी जिल्हा नियोजन समिती किंवा आमदार निधीतून या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. सध्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे वादळ वारा पाऊस झाला असल्यास त्याच बरोबर रेल्वे क्रॉसिंग वर केबल जळाल्यास वीजपुरवठा खंडित होतो त्यामुळे अनेकदा 12 तासांपेक्षा जास्त कालावधी लागतो. विशेषतः रात्रीच्या वेळी जंगलातून पेट्रोलिंग करत वायरमन तसेच विद्युत सहाय्यक बांधव अत्याधुनिक साहित्याच्या अभावीही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतात. येत्या पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरणसमोर मोठे आव्हान असून, तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी केली आहे. यामध्ये जुन्या 11 केव्ही लाईनचे नूतनीकरण तसेच मनुष्यबळ वाढवून अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करणे त्याच बरोबर जिल्हा नियोजन/आमदार निधीतून निधी उपलब्ध करून नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी कार्य करणे अपेक्षित आहे.
वडगाव तसेच पहाण मोहाडी पर्यंत असलेल्या ग्रामीण भागातील वादळ वाऱ्यामुळे वीज पुरवठा वारंवार बंद होतो याची खात्री आहे. परिसरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता नक्कीच स्थानिक आमदार म्हणून जिल्हा नियोजन समिती किंवा आमदार निधीतून नवीन वीज पुरवठा करणाऱ्या ग्रामीण भागातील लाईनला बदलण्याचे काम करण्यासाठी प्रयत्न करेल तो संबंधित अधिकाऱ्यांना देखील या संदर्भात सूचना देऊन विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो- आमदार किशोर आप्पा पाटील (पाचोरा भडगाव विधानसभा)