जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोरा कृष्णपूरीतील श्री स्वामी समर्थ ऑटो गॅरेजचे दिनेश पवार यांचे वडील तुकाराम पवार यांचे निधन

पाचोरा: श्री स्वामी समर्थ ऑटो गॅरेजचे मालक दिनेश पवार यांचे वडील, कै. तुकाराम महादू पवार (वय ६५), यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
तुकाराम पवार हे पाचोरा येथील कृष्णापुरी भागात वास्तव्यास होते. ते त्यांच्या हसतमुख, मनमिळावू आणि विनोदी स्वभावासाठी ओळखले जात होते. मालवाहतूक गाडी चालवून त्यांनी अनेक व्यापारी आणि ग्राहकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या जाण्याने पाचोरा परिसरातील अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून आणि नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पवार कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांची अंत्ययात्रा उद्या, दिनांक १६ सप्टेंबर २०२५, मंगळवार रोजी सकाळी ११:०० वाजता कृष्णापुरी, भारत डेअरी बसस्टॉप, पाचोरा येथून निघेल.