टॅली प्रोफेशनल अकॅडेमीला ‘ज्ञान गौरव पुरस्कार’ सलग पाचव्यांदा प्रदान

नागपूर: शिक्षण क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाचोरा येथील टॅली प्रोफेशनल अकॅडेमीला यंदाच्या इंडिया एज्युकेशन अवॉर्ड्स २०२५ या भव्य सोहळ्यात ‘ज्ञान गौरव पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, अकॅडेमीला हा मानाचा पुरस्कार सलग पाचव्यांदा मिळाला आहे, जे त्यांच्या भरीव योगदानाचे प्रतीक आहे.
नागपूर येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री आणि मिस इंडिया वर्ल्ड २००४ सायली भगत यांच्या हस्ते अकॅडेमीचे संचालक अमीन पिंजारी आणि आसिफ पिंजारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी एआयसीपीईचे (AICPE) संचालक श्री. शरद तावरी आणि सौ. कविता तावरी हेही उपस्थित होते.
टॅली प्रोफेशनल अकॅडेमीने अल्पकाळातच शिक्षण क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अकॅडेमीमध्ये टॅली प्राईम, डेटा एंट्री ऑपरेटर, ऍडव्हान्स एक्सेल अशा रोजगाराभिमुख संगणक अभ्यासक्रमांवर भर दिला जातो. ग्रामीण आणि शहरी भागातील शेकडो विद्यार्थ्यांना अत्याधुनिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम बनवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही संस्था करत आहे.
आजवरच्या उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे अकॅडेमीने विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा विश्वास संपादन केला आहे. या प्रतिष्ठित पुरस्काराबद्दल संचालक अमीन पिंजारी आणि आसिफ पिंजारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.