कृष्णापुरीतील माजी नगरसेवक सोमनाथ महाजन यांचे सुपुत्र राकेश महाजन यांचा शिवसेनेत प्रवेश

पाचोरा: पाचोरा शहरातील माजी नगरसेवक, दिवंगत सोमनाथ महाजन यांचे सुपुत्र राकेश महाजन यांनी आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे पाचोरा शहरात शिवसेनेची (शिंदे गट) ताकद आणखी वाढली आहे.
या वेळी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष किशोर आप्पा बारावकर, माजी नगरसेवक रवींद्र पाटील, तालुका उपप्रमुख संतोष महाजन, शहर प्रमुख सुमित सावंत आणि भोला पाटील, शहर संघटक कृष्णा महाजन, शेतकरी सेनाप्रमुख सुनील महाजन, तसेच उमेश एरंडे, सनी साठे, शरद पाटील, आणि अमन झाजोटे यांसारखे महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार किशोर पाटील यांनी राकेश महाजन यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला शहरात अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. राकेश महाजन यांनी पक्षवाढीसाठी काम करण्याचे आश्वासन दिले.
या घटनेने पाचोरा शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, आगामी काळात शिवसेनेची (शिंदे गट) वाटचाल कशी राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.