मराठा सेवा संघाची पाचोरा-भडगाव येथे बैठक: नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

पाचोरा:मराठा सेवा संघाच्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांची तसेच आजी-माजी पदाधिकाऱ्यांची बैठक रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी पाचोऱ्यातील शासकीय विश्रामगृहात (रेस्ट हाऊस) पार पडली. विभागीय कार्याध्यक्ष रामदादा पवार, प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील साहेब, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर काही महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
या बैठकीत, शिवश्री सुनील पाटील यांची तालुकाध्यक्ष पदावरून जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच, शिवश्री राहुल बोरसे यांची पाचोरा तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. शिवश्री नितीन पाटील यांची पाचोरा शहराध्यक्षपदी आणि शिवश्री महेश पाटील यांची पंजाबराव देशमुख शिक्षण परिषद तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या बैठकीला मराठा सेवा संघाचे आजी-माजी पदाधिकारी आणि सेवा संघाशी संबंधित अनेक मान्यवर उपस्थित होते.





