जळगाव जिल्हाताज्या बातम्या
दु:खद निधन:कृष्णापुरीतील गणेश युवराज बोरसे (वय ३८) यांचे अल्पशा आजाराने निधन!

पाचोरा: नांदखुर्दे, ता. एरंडोल येथील रहिवासी व सध्या ह.मु. कृष्णापुरी, पाचोरा येथे वास्तव्यास असलेले गणेश युवराज बोरसे यांचे आज, ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. ते अवघे ३८ वर्षांचे होते.
त्यांच्यावर आज, ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता पाचोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वर्गीय गणेश बोरसे हे पाचोरा येथील ॲड. शांतीलाल सैंदाणे यांचे भाचे होते. तसेच, ज्ञानेश्वर युवराज बोरसे (नानू भाऊ)आणि पत्रकार प्रवीण बोरसे यांचे ते मोठे बंधु होते.






