पाचोरा शिवसेना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती! नितीन तायडे,किरण परदेशी यांना जबाबदारी

पाचोरा: नुकत्याच जाहीर झालेल्या शिवसेना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पाचोरा येथील अनेक महत्त्वाच्या युवा कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील त्र्यंबक नगर आणि बहिरम नगर येथील रहिवासी किरण मधुकर परदेशी यांची शहर संघटक म्हणून नियुक्ती झाली आहे.
तर, पाचोरा शहरात आरोग्य मित्र म्हणून आपली नवी ओळख निर्माण केलेले सामाजिक कार्यकर्ते नितीन देवाजी तायडे यांची जळगाव जिल्हा समन्वयक या महत्त्वाच्या पदावर निवड करण्यात आली आहे.
या दोन्ही नियुक्तींची अधिकृत पत्रे मुंबई येथील शिवसेना कार्यालयातून प्राप्त झाली आहेत. युवासेनेच्या या महत्त्वाच्या पदांवर वर्णी लागल्याबद्दल तायडे आणि परदेशी यांच्यावर सध्या पंचक्रोशीतून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. या नियुक्त्यांमुळे पाचोरा शहरातील युवासेनेच्या कार्याला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






