निस्वार्थी किशोर पाटलांचे विश्वासू मयूर महाजन यांची युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस पदी निवड! शिवसेनेत निष्ठावान कार्यकर्त्याला मोठी संधी.

पाचोरा : अनेक वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय असलेले आणि निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे मयूर सुधाकर महाजन यांना शिवसेना युवा सेनेत मोठी जबाबदारी मिळाली आहे. पक्षाने त्यांची जिल्हा सरचिटणीस पदावर नियुक्ती केली आहे, ज्यामुळे त्यांच्यावर संघटनात्मक बांधणीची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसराचे रहिवासी असलेले मयूर महाजन हे सुधाकर महाजन यांचे सुपुत्र आहेत. त्यांची ओळख केवळ एका सक्रिय युवासैनिकाची नसून, ते स्थानिक आमदार किशोर पाटील यांचे विश्वासू आणि खंदा समर्थक म्हणूनही ओळखले जातात. नेत्याला पुढे नेण्यासाठी जसे तळागाळातील कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे लागते, तसे जाळे कृष्णापुरी परिसरात मयूर महाजन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उभे केले आहे. त्यांच्या याच संघटन कौशल्याची आणि शिवसेनेप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेत पक्षाने त्यांना सदस्य ते थेट जिल्हा सरचिटणीस पदापर्यंतची मोठी संधी दिली आहे.
या मोठ्या संधीमुळे येणाऱ्या काळात मयूर महाजन हे पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच सामाजिक कार्यामध्येही अग्रेसर होऊन काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मयूर महाजन यांना मिळालेल्या या महत्त्वाच्या पदाबद्दल त्यांचे माळी समाज पंच मंडळ आणि व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटना वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीमुळे पाचोरा शहर आणि कृष्णापुरी परिसरात शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.






