पाचोरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५: प्रभाग आरक्षण सोडत जाहीर!

पाचोरा (मधुर खान्देश वृत्तसेवा): पाचोरा नगरपरिषदेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत आज,दिनांक ०८/१०/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता व्यापारी भवन येथे जाहीर करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आणि सन २०११ च्या जनगणनेनुसार तयार करण्यात आलेल्या १४ प्रभागांतील एकूण २८ जागांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली.
यात नगरपरिषद सदस्यांसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षणाची स्थिती निश्चित करण्यात आली.
- सोडतीची प्रक्रिया आणि उपस्थिती
आरक्षण सोडतीची प्रक्रिया गो. से. हायस्कूलमधील विद्यार्थी असलेल्या कु. चेतन किशोर पाटील (इयत्ता सातवी) आणि कु. लावण्या बबनराव पाटील (इयत्ता सहावी) यांच्या हस्ते सोडतीच्या चिठ्ठ्या काढून पार पाडण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. भूषण अहिरे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. त्याचप्रमाणे मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे, उपमुख्याधिकारी श्री. दुर्गेश सोनवणे, करअधीक्षक श्री. डी. एस. मराठे यांसह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या महत्त्वाच्या सोडतीसाठी शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
• जाहीर झालेले प्रभाग आरक्षण (एकूण २८ जागा)
पाचोरा नगरपरिषदेच्या १४ प्रभागांतील २८ जागांसाठी खालीलप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे







