पाचोऱ्यातील बाहेरपुरा परिसरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुदाम भाऊ चौधरी यांच्या सौभाग्यवती उषाबाई चौधरी यांचा वॉर्ड क्र. २ साठी इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल!

पाचोरा :आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय प्रत्येक वार्डातील हालचाली लक्षात घेता या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते व माजी नगरसेवक सुदाम भाऊ चौधरी यांच्या सौभाग्यवती उषाबाई सुदाम चौधरी यांनी प्रभाग क्रमांक दोन (वॉर्ड क्र. २) साठी आपला उमेदवारी अर्ज शिवसेना कार्यालयात दाखल केला आहे. शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्या निवडणूक लढवण्यास सज्ज झाल्या असून, सुदाम भाऊ चौधरी यांच्या जनसंपर्काचा त्यांना निश्चितच फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. उषाबाई चौधरी यांच्या उमेदवारीमुळे वॉर्ड क्र. २ मधील संपर्क मुळे निवडणुकीत रंगत येऊ शकते. सुदाम चौधरी यांचे सुपुत्र अण्णाभाऊ चौधरी यांनी यांनी याबाबत माहिती दिली असून नगरपालिका निवडणूकित स्थानिक समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अण्णाभाऊ चौधरी यांच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






