नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्यशैक्षणिक

रोटरी क्लब पाचोरा भडगाव कडून जागतिक पोलिओ निर्मूलन दिन उत्साहात साजरा


Advertisements
Ad 4

पाचोरा:जागतिक पोलिओ निर्मूलन दिनाचे औचित्य साधून (२४ ऑक्टोबर) रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांच्यातर्फे ग्रामीण रुग्णालय, पाचोरा येथे ‘पोलिओ नायनाट’ हा जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पोलिओ निर्मूलनाविषयी समाजात जागरूकता वाढवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

यावेळी पोलिओ निर्मूलन कार्यात मोलाचे योगदान देणारे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सतीश टाक, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंके, डॉ. विजय पाटील,डॉ. अक्षय सोनवणे, डॉ. पंकज नानकर,डॉ. इम्रान शेख आणि डॉ. अनुपमा भावसार यांचा रोटरी क्लबकडून विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या वेळी बोलताना रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली आणि सदस्य संजय कोतकर यांनी पोलिओ निर्मूलनाच्या जागतिक प्रयत्नांमध्ये रोटरीने दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचे आवर्जून कौतुक केले. त्यांनी स्पष्ट केले की, पोलिओ डोसचे केवळ दोन थेंब आपल्याला पोलिओसारख्या भयंकर आणि अपंगत्व आणणाऱ्या आजारापासून कायमचे वाचवू शकतात. ओरल पोलिओ डोसच्या व्यापक वापरामुळे आज संपूर्ण जग जवळजवळ पोलिओमुक्त झाले आहे आणि हे मोठे यश आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, सचिव डॉ. अजयसिंग परदेशी, रोटरी सदस्य डॉ. घनश्याम चौधरी,डॉ. गोरख महाजन,चंद्रकांत लोढाया,भरत सिनकर,चिंतामण पाटील,संजय कोतकर,रावसाहेब पाटील,शैलेश कुलकर्णी,नितीन तायडे,तसेच रोट्रॅक्ट क्लबचे पदाधिकारी व सदस्य नेत्रज ढाकरे,मानव सालोमन,प्रथमेश ढाकरे,अमन सर, अथर्व सरताळे,लक्ष्मण जाधव,पुंडलिक पाटील, चेतन सरोदे आणि ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button