पाचोरा: कुरंगी-बांबरुड गटात उमेदवारीसाठी रस्सीखेच! ‘या’ तिघांची प्रमुख चर्चा, पण माळ कुणाच्या गळ्यात? बंडखोरी होणार की,आमदारांचा शब्द पाळणार?

पाचोरा, [5 नोव्हेंबर 2025]: नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होताच, आता जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वारेही वाहू लागले आहेत. विशेषतः पाचोरा तालुक्यातील महत्त्वाच्या कुरंगी-बांबरुड गटात उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत असून, राजकीय वर्तुळात अनेक नावांची चर्चा रंगली आहे.
प्रमुख चर्चेतील उमेदवार:
• किरण पाटील (युवा उद्योजक, शिवसेना-शिंदे गट): आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि व्यवसायाच्या माध्यमातून परिसरात स्थान निर्माण केलेले युवा उद्योजक.
• राहुल बेहरे यांच्या पत्नी / माजी जि.प. सदस्य पद्मसिंग पाटील (शिवसेना-शिंदे गट): पोलीस सेवेतील राहुल बेहरे यांना मानणारा मोठा वर्ग असू त्यांना देखील मतदारांची चांगली पसंती आहे, तर माजी जि.प. सदस्य पद्मसिंग पाटील हे शिवसेनेचे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. मात्र किरण पाटील हडसनकर (शिवसेना-शिंदे गट): यांचेही नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत असल्याचे चित्र आहे.
- शर्यतीत इतरही दिग्गज:
या तिघांव्यतिरिक्त, शिवसेना-शिंदे गटात नुकताच प्रवेश केलेल्या महिला कार्यकर्त्या अस्मिता पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास महिला नेतृत्वाला सन्मान मिळेल, असे बोलले जात आहे. तर, नांद्रा येथील विनोद तावडे यांनी योग्य वेळी आमदार सांगतील तसे काम करण्याची भूमिका घेतली आहे. - भाजपचा (BJP) पर्याय:दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाकडून वाघ कुटुंबातील सदस्याला संधी मिळेल, अशी शक्यता आहे. तसेच, माजी सभापती बन्सीलाल पाटील किंवा वेरुळी येथील शरद पाटील यांनाही भाजपकडून उमेदवारी मिळू शकते.
- आर्थिक गणित की ग्रामीण विकास?
या निवडणुकीत उमेदवाराचे आर्थिक गणित काही प्रमाणात महत्त्वाचे ठरू शकते, मात्र मुख्य पसंती मिळेल ती: - कौशल्याने मतदारांच्या मनात जागा निर्माण करणाऱ्याला.
मागील काळात केलेल्या ग्रामीण विकासाच्या मुद्द्यावर उमेदवारी करणाऱ्यास. - सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या आणि जनतेला वेळ देणाऱ्या उमेदवाराला.
- बंडखोरीची शक्यता: शिवसेना (शिंदे गट) एकाच उमेदवाराला उमेदवारी देणार असल्याने, तिकीट न मिळालेले नाराज उमेदवार बंडखोरी करण्याची शक्यता आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अखेरीस, उमेदवारीची माळ नेमकी कोणत्या सर्वगुणसंपन्न आणि लोकसंपर्क असलेल्या उमेदवाराच्या गळ्यात पडते, हे बघावे लागणार आहे.





