जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराज्यसंपादकीय
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवारपासून! जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांचे आवाहन

पाचोरा/भडगाव: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू होताच, राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चितीची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना शिंदे पक्षाकडून पाचोरा व भडगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांची मोठी गर्दी लक्षात घेता, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील स्वतः विविध प्रभागांतील इच्छुकांशी संवाद साधणार आहेत.
- पाचोरा नगरपालिका:
- दिनांक: शुक्रवार, ७ नोव्हेंबर
- वेळ: सकाळी १० वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवालय शिवसेना कार्यालय येथे होणार आहेत
- भडगाव नगरपालिका:
- दिनांक: शनिवार, ८ नोव्हेंबर
- वेळ: सकाळी १० वाजल्यापासून
- ठिकाण: भडगाव येथील शिवसेना कार्यालय
जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी सर्व इच्छुक उमेदवारांना त्यांच्या प्रभागाच्या परिपूर्ण माहितीसह मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ‘आता निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे आणि मुलाखतींचा हा टप्पा म्हणजे उमेदवारांची चाचपणी. योग्य आणि दमदार उमेदवार निवडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,’ असे रावसाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.





