पाचोरा तालुक्यातील पाणबुड्या मोटारी चोरणारेच निघाले मोटर सायकली चोर! जळगाव LCB कडून अटक!

पाचोरा: पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन गुरनं ८५/२०२५ भा.न्या.सं.३०३ (२) या गुन्ह्यातील मध्ये दाखल शेतामधील पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार चोरी बाबत चोरी बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर भागात होणा-या चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाकरीता बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा जळगाव यांनी पोउनि शेखर डोमाळे, पोह लक्ष्मण पाटील, पोना रणजित जाधव, पोकॉ जितेंद्र पाटील, पोकॉ भुषण पाटील, चापोह भारत पाटील सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक नेमण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पथकास गोपनीय सूत्रांची माहिती मिळाली असता सचिन बापुराव पाटील रा. पिंपरी ता.पाचोरा याने त्याच्या साथीदारासह पाणबुडी इलेक्ट्रीक मोटारांची चोरी केली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली असल्याने त्यावरून सदर पथकाने सचिन बापुराव पाटील रा. पिंपरी ता पाचोरा याबाबत माहिती काढून तो पिंपरी ता. पाचोरा जि. जळगाव येथे त्याचे घरी असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सचिन बापुराव पाटील, वय २९ रा. पिंपरी ता पाचोरा जि. जळगाव असे सांगीतले. त्यावरून त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने त्याचे साथीदार नामे भगवान लक्ष्मण पाटील व राहुल त्र्यंबक पाटील दोन्ही. रा. पिंपरी ता पाचोरा यांच्या सोबत मिळुन १) पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे.ला गुरनं ८५/२०२५ भा.न्या.सं.३०३ (२), २) पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे. गुरनं ११५/२०२२ भा.न्या.सं.३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाणबुडी इलेक्ट्रीक मोटारींची चोरी केल्याची कबुली दिल्याने संदर संशयित ईसमास ताब्यात घेवुन सदर पथकाने तात्काळ पिंपरी ता पाचोरा येथुन १) भगवान लक्ष्मण पाटील व २) राहुल त्र्यंबक पाटील दोन्ही. रा. पिंपरी ता पाचोरा यांचा शोध घेवुन विचारपुस केली असता त्यांनी वर नमुद प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरी केलेची कबुली देवुन चोरी केलेल्या एकुण १७ नग इलेक्ट्रीक पाणबुडी मोटार काढून दिल्या.
सदर आरोपी यांना विश्वसात घेवुन विचारपुस केली असता संशयित आरोपी १) सचिन बापुराव पाटील, वय २९, २) भगवान लक्ष्मण पाटील दोन्ही. रा. पिंपरी ता पाचोरा यांनी मिळून पाचोरा शहरातुन व तालुक्यातुन मोटार सायकल चोरी केल्याचे निष्पण्ण झाल्याने त्यांनी चोरीच्या ०४ मोटार सायकल काढुन दिल्याने सदर मोटार सायकल चोरी बाबत १) पाचोरा पोस्टे गुरन ७९/२०२५ भा.न्या.सं.३०३(२), २) पाचोरा पोस्टे गुरन १०१/२०२५ भा.न्या.सं.३०३ (२), ३) पाचोरा पोस्टे गुरन १४६/२०२५ भा.न्या.सं.३०३ प्रमाणे गुन्ह दाखल आहेत.
वा नमुद प्रमाणे संशयित आरोपी नामे १) सचिन बापुराव पाटील, वय २९, २) भगवान लक्ष्मण पाटील, वय ३६, ३) राहुल त्र्यंबक पाटील वय २२, सर्व रा. पिंपरी ता पाचोरा यांना गुन्ह्याच्या पुढील तपासाकामी पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे.ला गुरनं ८५/२०२५ भा.न्या.सं.३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेवून पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे. ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी, जळगाव,श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. आपल्या परिसरात जर आपल्याला संशयास्पद कोणी व्यक्ती आढळून आला असल्यास तात्काळ आपण पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन देखील पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.