नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाराज्य

ब्रेकिंग न्यूज: पाचोऱ्यात मध्यरात्रीच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान अवैधपणे गुटखा वाहतूक करणारे वाहनासह लाखोंचा मुद्देमाल जप्त झाल्याची सूत्रांची माहिती.


Advertisements
Ad 4

दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी सकाळी तीन ते चार वाजेच्या सुमारास वरखेडी नाका येथे पाचोरा पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान सकाळच्या सुमारास एक महत्त्वपूर्ण कारवाई करत अवैध गुटखा वाहतूक करणारे वाहन जप्त केले बाबतची माहिती प्राप्त झाली आहे. सदर कारवाईत लाखो रुपये किमतीचा गुटखा व एक मोठे वाहन जप्त देखील जप्त करण्यात आले असून शहरातील पोलिसांच्या रात्रीच्या गस्त व नाकाबंदी दरम्यान अवैध गुटखा वाहतुकीला आळा घालण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. जप्त केलेल्या वाहनाची आणि गुटख्याची सविस्तर तपासणी पोलिसांच्या वतीने सुरू असून या घटनेमुळे पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेचे आणि अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवणे बाबत महत्वाची भूमिका बघण्यास मिळाली आहे. सदर कारवाई पाचोरा पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी पोलिस कॉन्स्टेबल राहुल शिंपी,सुनील पाटील व समीर पाटील,यांच्या मदतीने केली आहे. सदर जप्त केलेले वाहनाचा मालक कोण याबाबत कुठलीही माहिती प्राप्त नाही.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button