पाचोरा शहरात लाखोंचा गुटखा पोलिसांच्या ताब्यात! दोन जणांवर गुन्हा दाखल

पाचोरा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील वरखेडी नाका येथे नाकाबंदी दरम्यान अनाधिकृतपणे गुटखा वाहतुक करणा-या वाहनावर कारवाई करण्यात आली आहे.
पाचोरा येथे दि.31 मार्च 2025 च्या मध्यरात्री वरखेडी नाका, पाचोरा येथे नाकाबंदी साठी सपोनि दिनेश भदाणे, पोहेकों राहुल काशिनाथ शिंपी, समीर बापुराव पाटील, सुनिल आनंदा पाटील असे रात्री 1 ते 4 वाजेच्या दरम्यान नाकाबंदी करीत असतांना एक जामनेर रोड कडुन पाचोरा रोड कडे एक वाहन येतांना दिसले असता सदर वाहनावर पोलीसांना संशय आल्याने त्यांस थांबण्याचा इशारा केला असता वाहनावरील चालक हा त्याचे वाहन पळवुन घेवु लागला असता त्यास ०३.१५ वा.चे सुमारास थांबवून सदर वाहन चालकास त्याचे नाव, गाव विचारता त्याने त्याचे नाव दत्तु लालदास बैरागी, वय, ३१ वर्षे, रा. सिंधी कॉलनी, इंदिरा गांधी सिंधी शाळेजवळ, चाळीसगांच, जि. जळगांव असे सांगीतले. सदर चालकास त्याची अशोक लेलंड कंपनीचे दोस्त प्लस मॉडेल असलेले क्रिम रंगाची गाडी क्रमांक एम.एच.-५२, ००३४ यामध्ये काय माल आहे याबाचत विचारणा करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसांना सदर गाडीचा संशय आल्याने त्यांनी. सदर गाडीचे पाठीमागे जावुन बघीतले असता सदर गाडीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत पान मसाला व तंबाखु असल्याचे आढळुन आले. तात्काळ पंचाना बोलावुन पंचाचे उपस्थितीत सदर वाहन चालक व त्याचे ताब्यातील गाडीमधील गुटखा हा पाचोरा पोलीस ठाणे येथे आणला. त्यामध्ये खालील वर्णनाचा माल आढळून आला त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
१) ९,४०,०००/- रुपये किंमतीचे विमल पान मसाल्याचे २० पोते, एका पोत्यामध्ये ५ लहान पांढरी गोणी, एका गोणीत ४ गठठे, एका गठयामध्ये विमल पान मसाला केसरयुक्त असे लिहीलेले हिरव्या रंगाचे ५ पाऊच, असे एकुण २,००० पाऊच, एका पाऊचची किंमत ४७०/- रुपये.
२) ३,०४,९२०/- रुपये किंमतीचे विमल पान मसाल्याचे ०७ पोते, एका पोत्यामध्ये १० लहान पांढरी गोणी, एका गोणीत विमल पान मसाला केसरयुक्त असे लिहीलेले निळ्या रंगाचे २२ पाऊच, असे एकुण १,५४० पाऊच, एका पाऊचची किंमत १९८/- रुपये.
३) ७,७७,९२०/- रुपये किंमतीचे विमल पान मसाल्याचे २० पोते, एका पोत्यामध्ये ४ लहान पांढरी गोणी, एका गोणीत विमल पान मसाला केसरयुक्त असे लिहीलेले हिरव्या रंगाचे ५२ पाऊच, असे एकुण ४,१६० पाऊच, एका पाऊचची किंमत १८७/- रुपये.
४) ६०,०००/- रुपये किंमतीचे वि-१ तम्बाकु चे २० लहान पोते, एका पोत्यामध्ये ५ लहान पांढरी गोणी, एका गोणीत २० पाऊच, असे एकूण हिरव्या रंगाचे २,००० पाऊच, त्यावर वि-१ बिग तम्बाकु असे लिहीलेले, एका पाऊचची किंमत ३०/- रुपये.
५) ३३,८८०/- रुपये किंमतीचे वि-१ तम्बाकु चे ०७ लहान पोते, एका पोत्यामध्ये १० लहान पांढरी गोणी, एका गोणीत २२ पाऊच, असे एकूण जांभळ्या रंगाचे १,५४० पाऊच, त्यावर वि-१ तम्बाकु असे लिहीलेले, एका पाऊचची किंमत २२/- रुपये.
६) १,३७,२८०/- रुपये किंमतीचे वि-१ तम्बाकू चे ०४ मोठे पोते, एका पोत्यामध्ये ०५ लहान पांढरी गोणी, एका गोणीत ०४ गठठे, एका गठ्यात ५२ पाऊच, असे एकुण हिरव्या रंगाचे ४,१६० पाऊच, त्यावर वि-१ तम्बाकु असे लिहीलेले, एका पाऊचची किंमत ३३/- रुपये.
७) ८,००,०००/- रुपये किंमतीचे एक अशोक लेलंड कंपनीचे दोस्त प्लस मॉडेल असलेले क्रिम रंगाची गाडी क्रमांक एम.एच.-५२, ००३४ अशा वर्णनाची जु.वा.कि.सु.
३०,५४,०००/- रुपये एकुण
सदर बाबत पाचोरा पोलीस ठाणेस गु.रजि. क्रमांक १६४/२०२५, भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम सन २००६ चे कलामान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर बाबत गाडी चालक नामे १) दत्तु लालदास बैरागी, वय. ३१ वर्षे, रा. सिंधी कॉलनी, इंदिरा गांधी सिंधी शाळेजवळ, चाळीसगांव, जि. जळगांव व मालक २) सनी टेकचंद पंजाबी, वय. ३५ वर्षे, रा. सिंधी कॉलनी, पाचोरा, जि. जळगांव यांना सदर गुन्हयात अटक करुन मा. पाचोरा न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी रिमांड मंजुर केल्याने त्यांना सब जेल जळगांव येथे सोडण्यात आले आहे. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक सोो, श्री. महेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगांव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अशोक पवार, सपोनि श्री. दिनेश विलासराव भदाणे, पोउपनिरी श्री. सोपान गोरे, पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी, पोहेकों समीर बापुराव पाटील, सुनिल आनंदा पाटील यांनी पार पाडली आहे.