पाचोऱ्यातील पत्रकार राहुल महाजन यांच्या “मधुर खान्देश” वृत्तपत्राला केंद्र सरकारची मान्यता! नवीन (PRGI) वृत्तपत्र नोंदणी कायद्यानुसार तालुक्यातील पहिले पत्रकार

जळगाव:देशात नवीन वृत्तपत्र नोंदणी कायद्यानुसार पाचोऱ्यातील पत्रकार राहुल महाजन यांच्या “मधुर खान्देश” या वृत्तपत्राला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. राहुल महाजन ही मागील पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी पासून उल्लेखनीय कामगिरी करत असून त्यांची जनमानसांत चांगली प्रतिमा निर्माण झाली असून नवीन वृत्तपत्र कायद्याच्या निकषांनुसार राहुल महाजन हे नवीन PRGI कायद्यानुसार पाचोरा तालुक्यातील पहिले मान्यता प्राप्त पत्रकार ठरले आहेत. या यशामुळे स्थानिक पत्रकारितेला एक नवीन दिशा मिळाली असून, त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. “मधुर खान्देश” हे साप्ताहिक वृत्तपत्र आता अधिकृतपणे मान्यताप्राप्त झाल्याने, ते या भागातील घडामोडी आणि जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्याचे माध्यम बनू शकेल पत्रकारिता क्षेत्रात चांगले काम करण्यासाठी त्यांचा त्यांचे मोठे बंधू जेष्ठ पत्रकार अनिल महाजन,मुंबई यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्यानेचे हे सगळे शक्य झाले असल्याचे देखील राहुल महाजन यांनी व्यक्त केले आहे.