Dysp सचिन कदम बस नाम ही कॉफी है! पोलिस महासंचालक पदक प्राप्त;सर्वत्र अभिनंदन

मधुर खान्देश वृत्तसेवा: पाचोरा येथे मागील काळात प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असलेले पोलीस उप अधीक्षक श्री सचिन कदम (सध्या अपर पोलीस अधीक्षक – एसीबी),मुंबई येथे पदावर असलेले यांना उत्कृष्ट तपासकरिता पोलीस महासंचालक पदक (DG INSIGNIA) प्राप्त झाले आहे. अकोला जिल्ह्यात कार्यरत असतांना बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये आरोपीस दुहेरी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे याबाबत त्यांना उत्कृष्ट कार्य केल्यावर पुरस्कार मिळाला आहे. तर मागील काळामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्तीला असलेले सचिन कदम यांचा दरारा खूप मोठ्या प्रमाणावर जळगाव जिल्ह्यात नावारूपाला आला होता त्यांच्या काळामध्ये अवैध धंदेवाली चांगली दमचाक झाली होती अनेक कारवाई त्यांनी त्यांच्या प्रशिक्षणार्थी काळामध्ये पूर्ण केले आहेत कदाचित त्यांच्या या अनुभवाचा त्यांना या पुरस्कारासाठी फायदा झाला असावा असे मत व्यक्त करण्यात आली आहे.