ब्रेकिंग न्यूज: पाचोरा येथील राधास्वामी पेट्रोल पंपावर नियमांचे उल्लंघन आणि मनमानी कारभार, पेट्रोल भरताय तर सावधान…! ऑनलाइन सुविधा घ्यायच्यातर पैसे मोजा…टाक्यांची स्वच्छता,घाणीचे साम्राज्य… अपघाताला आमंत्रण

या प्रकरणावर पेट्रोल पंप व्यवस्थापकांनी यावर प्रतिक्रिया देत सांगितले आहे की, यानंतर सर्व सुविधा सुरळीत आणि विनामूल्य या ठिकाणी देण्यात येतील. व झालेल्या प्रकार निंदनीय आहे यानंतर अशा प्रकार होणार नाही याबाबत काळजी घेऊन पंपावरील कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. (जितू पंजाबी, व्यवस्थापक राधास्वामी पेट्रोल पंप)
पाचोरा: शहरातील राधास्वामी पेट्रोल पंपावर नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. येथे शेकडो लिटर पेट्रोल आणि डिझेल अवैधरित्या कॅनमध्ये भरून विक्री केली जात असल्याची माहिती उघड झाली आहे. या पेट्रोल पंपाच्या मनमानी कारभारामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे.
टाक्यांची स्वच्छता आणि सीसीटीव्ही रेकॉर्डिंगवर प्रश्नचिन्ह?
ग्राहकांनी येथील पेट्रोल आणि डिझेलच्या टाक्या किती दिवसांनी साफ केल्या जातात, याबाबत विचारणा करणे गरजेचे आहे. तसेच, अवैध विक्रीच्या सुरू असलेला व्यवसाय पेट्रोल पंप प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग तपासणीसाठी खुले करावे, अशी मागणी केली जात आहे. यामुळे पंपावरील कारभाराची पारदर्शकता तपासली जाऊ शकते.
ऑनलाइन पेमेंट सुविधेचा अभाव
शासनाने प्रत्येक पेट्रोल पंपावर रोखीऐवजी ऑनलाइन पेमेंट सुविधा उपलब्ध करणे बंधनकारक केले आहे. मात्र, एखाद्या ग्राहकाला तातडीने रोखी स्वरूपात रक्कम लागत असेल तर ती पेट्रोल पंप धारकाने ऑनलाइन सुविधांचा वापर करून पेमेंट स्वीकारून देणे बंधनकारक आहे परंतु यासाठी देखील ग्राहकांना ऑनलाइन पेमेंटसाठी “चालकांना” पैसे द्यावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे.
सुरक्षेचा प्रश्न: अपघातांना आमंत्रण?
राधास्वामी पेट्रोल पंपावरील अनागोंदी कारभार आणि अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी या पंपाला “अपघातांना आमंत्रण” असे संबोधले आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
प्रशासन काय कारवाई करणार?
या गंभीर विषयानंतर आता प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राधास्वामी पेट्रोल पंपाच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.
त्या सविस्तर प्रकरणावर पेट्रोल पंप व्यवस्थापकांनी यावर प्रतिक्रिया देत सांगितले आहे की यानंतर सर्व सुविधा सुरळीत आणि विनामूल्य या ठिकाणी देण्यात येतील. व झालेल्या प्रकार निंदनीय आहे यानंतर अशा प्रकार होणार नाही याबाबत काळजी घेऊन पंपावरील कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आले आहेत. (जितू पंजाबी, व्यवस्थापक राधास्वामी पेट्रोल पंप)






