नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हा

लोकसभा-विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपने दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी कॉग्रेसचे एकदिवसीय धरणे आंदोलन


पाचोरा  – भाजपाने निवडणूकीत शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते त्याची आठवण करून देण्यासाठी कॉग्रेस ने एकदिवसीय धरणे आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, सोयाबीन, कापूस, तुर, व हरभरा, या पिकांची शासनाने त्वरित खरेदी करावी, खुल्या बाजारात कमी किमतीत विकलेल्या सोयाबीन, कापूस, तूर हरभरा या पिकांना भावांतर योजना जाहीर करावी, शेतकऱ्यांना लागणारे खते बियाणे कीटकनाशक व अवजारे यांना जीएसटी मुक्त करावे.  पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी इतर आणि शहरातील वीज ग्राहकांना वीज मंडळाने जे स्मार्ट मीटर बळजबरीने बसवणे सुरू केले आहे ते मीटर बसवणे त्वरित बंद करावे अशा प्रमुख मागण्या घेऊन एक दिवशीय धरणे आंदोलन कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी भाजप सरकार ला आठवण देण्यासाठी च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी नायब तहसीलदार विनोद कुमावत यांना निवेदन देण्यात आले.  यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रदीपराव पवार, तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, प्रदेश प्रतिनिधि शेख ईस्माइल शेख फकिरा, जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा सचिव राजेंद्र महाजन, इरफान मनियार, युवक प्रदेश सरचिटणीस आशुतोष पवार, मनोहर महाले, महीला सरचिटणीस कुसुम पाटील, शरीफ शेख, शंकर सोनवणे, उबाठा चे अरुण पाटील, अॅड के एस पाटील, आंनद अहीरे, नवल भोई, युवक काँग्रेस अध्यक्ष कल्पेश येवले, सुनील पाटील, मुबारक शेख, प्रकाश भिवसने, साहेबराव पाटील, दशरथ पाटील, रामसिंग जाधव, रविंद राठोड, चेतन बोदवडे आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button