पाचोरा येथे “मधुर खान्देश” वृत्तपत्राचा लोकार्पण आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न.

पाचोरा, दि. ४ एप्रिल २०२५ रोजी पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील व्यापारी भवनात “मधुर खान्देश” या स्थानिक वृत्तपत्राचा प्रथम अंक प्रकाशन सोहळा व वृत्तसंस्थेचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण करण्यात आले आहे तर प्रमुख उपस्थिती म्हणून पाचोरा विभागाचे प्रांत अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा नेते, जेष्ठ पत्रकार अनिल भाऊ महाजन, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार, जितेंद्र जैन, प्राध्यापक चिंचोली सर, नगरसेवक विकास पाटील,प्रदीप देसले,प्रमोद सोनार,संजय एरंडे,दत्ता आबा बोरसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यामध्ये पत्रकार राहुल महाजन यांच्या मधुर खान्देश वृत्तपत्राच्या पाचोरा तालुक्यातील योगदानाचा गौरव करण्यात आला असून स्थानिक पत्रकारिता आणि समाजातील घडामोडींना वाचा फोडण्याच्या राहुल महाजन यांच्या प्रयत्नांचे सर्वांनी कौतुक केले. आमदार किशोर पाटील यांनी आपल्या भाषणात वृत्तपत्राच्या कार्याला शुभेच्छा देत आपल्या संपादकीय वृत्ताच्या माध्यमातून दिशाहीन झालेल्या तरुणांना मार्गदर्शन करावे,अनेक मुलांचे अद्याप लग्न नाहीत शेती व्यवसायाकडे लक्ष देऊन तंत्रज्ञांनाचा वापर करून युवा तरुणांनी शेतीकडे लक्ष द्यावे व प्रगती करावी पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे असे यावेळी सांगितले आहे.
• प्रांत अधिकारी भूषण अहिरे यांचे प्रतिक्रिया: राहुल महाजन म्हणजे त्यांचा परिचय देण्यात ठरलं तर प्रशासनाचे जवळचे मित्र म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी आलेल्या अधिकारी जसे की,प्रांत अधिकारी कचरे साहेब त्याचबरोबर बांदल साहेब यांनी मला राहुल महाजन यांची ओळख प्रशासनाचा मित्र म्हणून करून दिली होती. आणि ते खरंच त्या काबिल आहेत प्रशासनाच्या विविध विभागांमध्ये त्यांचे खूप चांगले संबंध त्यांनी प्रस्थापित करून मित्र तयार केले आहेत. यांच्या नव्याने सुरू झालेल्या मधुर खान्देश वृत्तपत्राला प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देतो त्यांना नुकत्याच नवीन पिआरपी कायदा 2023 वृत्तपत्र नोंदणी कायद्यानुसार पाचोऱ्यातील प्रथम नोंदणी प्राप्त झालेले हे वृत्तपत्र म्हणून परवानगी मिळाली आहे. मधुर खान्देश या माध्यमातून चांगल्या प्रमाणावर प्रशासकीय बातम्या त्याचबरोबर समाजातील शोषित वंचित पिढीताना न्याय देण्यासाठी काम करेल अशी अपेक्षा बाळगतो.
• नगरसेवक विकास पाटील यांची प्रतिक्रिया: राहुल महाजन हे अतिशय जिज्ञासू पत्रकार असून अभ्यास करून पत्रकारिता करणारा आमच्या कृष्णपुरीतील शान असलेला आपल्यातला एक कार्यकर्ता आहे. अतिशय स्मित आणि गोड भाष्य करणारा राहुलने पत्रकारितेच्या माध्यमातून खूप चांगली प्रगती केली असून याचे जिवंत उदाहरण या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले अधिकारी तसेच राजकीय मान्यवर दिसत आहेत.
• शिवसेना शिंदे पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रदीप देसले यांची प्रतिक्रिया: मधुर खान्देश वृत्तपत्राला शुभेच्छा दिल्या असून व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे काम हे पत्रकारांचे आहे आदीच्या काळात “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? ” असे प्रश्न विचारणाऱ्या जेष्ठ पत्रकार होते तशी धमक आजच्या पत्रकारांमध्ये आली पाहिजे असे मला वाटते. मधुर खानदेश चे मुख्य संपादक राहुल महाजन यांचा प्रवास खूप चांगला आहे अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या मधून खान्देश नक्कीच आमच्या शुभेच्छा राहतील असे मत व्यक्त करण्यात आले आहे.
• अशोक पवार,पोलिस निरीक्षक (पाचोरा पोलिस स्टेशन) : पत्रकार राहुल भाऊ महाजन म्हणजे प्रशासकीय यंत्रणेच्या पाठीमागे उभा राहून पाठबळ देणारा पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. बरेचदा आमच्याकडून काम करत असतांना अनावधनाने चुका होतात आणि त्या चुका अशा व्यक्तीकडून होता की जो काम करतो अशावेळी पत्रकार आमच्या पाठीशी उभे राहतात त्या सर्व पत्रकार बांधवांना मी शतशः नमन करतो आणि त्यांचे आभार मानतो. मधुर खान्देश आणि गर्जा महाराष्ट्र यांच्याशी माझा मागील पंधरा वर्षांपासून पारिवारिक संबंध आहे. नक्कीच मधुर खान्देश देखील महाराष्ट्र लेवल जाईल आणि त्या ठिकाणी देखील आम्हाला बोलण्याची संधी मिळेल असे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
● जेष्ठ पत्रकार अनिल महाजन यांची प्रतिक्रिया: मान्यवरांचे स्वागत करत भाषणाला सुरुवात केली असता राहुल महाजन माझे लहान बंधू आहेत यांच्या मधुर खान्देश वृत्तपत्राला माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. राहुल महाजन यांच्या शब्दाला मान देऊन याठिकाणी आमदार महोदयांसोबत मोठे अधिकारी या ठिकाणी आले म्हणजे राहुल मोठा झाला आहे हे यातून स्पष्ट होते राहुल ने अशीच प्रगती करावी मात्र पत्रकारिता करीत असतांना कुठल्याही वादात न पडता राजकीय,प्रशासकीय अधिकारी मंडळींशी संपर्क कायम ठेवून संबंध जोपासण्याचे काम करावे. काम करणाऱ्या व्यक्तीकडून चुका होतात आपल्याकडे पत्रकारिता आहे म्हणजे आपल्याला कुणाचेही चरित्र हरण करण्याचा अधिकार आपल्याला नाहीत. माझ्या सर्व पाचोरा तालुक्यातील पत्रकार बांधवांना थोडा उंच विचार करा एकत्र येण्याचा प्रयत्न करा..वेळ निघून गेल्यावर आपल्या हातात काहीच नसत वाद विवीध विसरा व प्रत्येक क्षण आनंदात जगा हाच माझा सल्ला आहे.
● आमदार किशोर पाटील: अध्यक्षीय भाषणात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सुरुवात करत आज साप्ताहिक मधुर खान्देश या वृत्तपत्राचे लोकार्पण झाले असे जाहीर करतो. पाचोरा कलाकारांचे शहर आहे असे मान्यवरांनी या ठिकाणी सांगितले पण मला अस वाटते की सगळेच कलाकार या ठिकाणी उपस्थित असून आजचे हे मधुर खान्देशचे व्यासपीठ एक पारिवारिक व्यासपीठ असून व्यासपिठावर बसलेले कलाकार आहेत परंतु या व्यासपीठावर बसलेल्या पेक्षा खाली बसलेले होते या ठिकाणी त्याहून मोठे कलाकार आहेत असे बोलत हास्य पिकले होते. महाजन कुटुंबातील अनिल महाजन याने कठीण प्रसंगातून आपल्या जीवनाची सुरुवात केली आणि मागील दहा ते पंधरा वर्षांपासून त्याचा हा प्रवास अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असून स्वतःचा विकास न करता कुटुंबाची व भावाची देखील प्रगती केली आहे. पत्रकारिता करत असताना नुसतं पत्रकारिता न करता आपली चांगली वेळ आपल्या हातातून निघून तर जात नाही ना याची देखील काळजी घेणे पत्रकार बांधवांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. लोकांना आपण आरसा दाखवत दाखवत आपणच आरसा विसरून जात आहात का असे देखील मत या ठिकाणी आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केले आहे. राहुल दादा आपण साप्ताहिकाची सुरुवात केली याबाबत तुमचे अभिनंदन आहे ज्याप्रमाणे सकाळ उद्योग समूहाचा ॲग्रोवन हे वृत्तपत्र शेतकरी बांधव शोधत असतात अशाच प्रकारे आपला देखील मधुर खानदेश लोकांनी शोधला पाहिजे असे यामध्ये आपण काम करून नावलौकिक व्हा. तुझा भाऊ अनिल दादा चारशे किलोमीटरवर आहे, किशोर आप्पा हाकेच्या अंतरावर आहे. कधीही मधुर खान्देशला मदत लागली तर आवाज दे किशोर आप्पा हजर राहील अश्या शुभेच्छा देत हसत खेळत या कार्यक्रमाची सांगता झाली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अयाज मोहसीन यांनी केले असून उपस्थितांचे आभार पत्रकार किशोर पाटील यांच्या वतीने मानण्यात आले असून आभार मानत असतांना सांगितले की राहुल महाजन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सदर कार्यक्रम अतिशय खेळी मेळीच्या वातावरणात पाचोऱ्यातील पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकीचा एक उत्तम नमुना ठरला असून हास्य कल्लोळात हा कार्यक्रम संपन्न झाला आहे.
मधुर खान्देश वृत्तपत्राच्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी पाचोरा येथील पत्रकार बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले यामध्ये पत्रकार नंदकुमार शेलकर, शांताराम चौधरी,प्रश्नात येवले,आबा सूर्यवंशी,अनिल आबा येवले,मिलिंद सोनवणे,प्रवीण बोरसे,निखिल मोर,दिलीप परदेशी,जावेद शेख,राजेंद्र खैरनार,चिंतामण पाटील,विनायक दिवटे,नरसिंग भुरे,टीव्ही9 चे किशोर पाटील, चंद्रकांत दुसाने साहेब,ईसा तडवी,सचिन गोसावी,बाबूलाल पटेल,बंडू सोनार,दिलीप पाटील,भुवणेश दुसाने,स्वप्नील कुमावत, गजानन गिरी तसेच आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी पाचोरा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते यामध्ये प्रवीण ब्राह्मणे, किशोर डोंगरे,सुधाकर वाघ,प्रा. चिंचोले सर,प्रमोद बारी,मनोज महाजन,दिपक तायडे,विनोद पाटील,गोकुळ सोनार,अभिलाषा रोकडे,अमोल जैन, भोजराज ब्राम्हणे,किशोर रायसाकडा,गोडसे सर,कृषी सहाय्यक रवींद्र पाटील,सुदर्शन महाजन, संतोष महाजन,महाले साहेब, कन्हैया देवरे,चिंदू मोकळ,ललित महाजन,विठ्ठल महाजन,अजहर खान,सुनील महाजन,राहुल जैन,स्वप्नील महाजन, प्रेम कुमार शामनानी सागर डीजेचे संचालक गुड्डू भाई,गोकुळ नेरपगार,हेमंत चव्हाण,अतुल महाजन,श्याम महाजन,दिपक मुळे,अजिंक्य वाघ आदी मित्र परिवार उपस्थित होते.
पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक पवार त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश बदाने पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण के परशुराम दळवी पोलीस कर्मचारी राहुल शिंपी,गजानन काळे,योगेश पाटील,वसीम शेख,नदीम शेख तसेच आदी पोलीस अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.