नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यातील वेरुळी येथील तरुण पाटाच्या पाण्यात बेपत्ता! शोध मोहीम सुरू


Advertisements
Ad 4

पाचोरा: वनी गडावर पायी यात्रेसाठी गेलेल्या पाचोरा तालुक्यातील वेरूळी खु.येथील भिल्ल समाजातील एका तरुणाचा जामदा कालवा पाटाच्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी गेला असता सदर इसम वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या तरुणाचे नाव सचिन सोनवणे उर्फ पिंकू असे असून, तो बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पिंकू भिल मित्रासोबत हा वनी गडावर पायी यात्रेसाठी गेला असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. आज सकाळी शिवणी जवळील पाटाच्या पाण्यात त्याचा आंघोळीसाठी गेला असता तो वाहून गेला असल्याचे प्रथमदर्शीकडून माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक तहसीलदार, पोलिस विभाग,पोलिस पाटील आणि गावकऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. सध्या या इसमाला शोधण्याचे प्रयत्न सुरू असून, अधिक तपास सुरू असून कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. बचाव पथक युद्धपातळीवर शोधकार्य करत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button