पुणे धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागरांचा मेरिटवर पारदर्शक कारभार!

● महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे अधिकृत प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन
पुणे:महाराष्ट्र माळी समाज महासंघाची २४/०७ ही संस्था पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत आहे. दि. १ एप्रिल २०२१ रोजी सदर संस्थेचा चेंज रिपोर्ट तत्कालीन असिस्टंट चारिटी कमिशनर पुणे श्री.राहुल चव्हाण यांनी चेंज रिपोर्ट क्रमांक ४४/१९ हा १ एप्रिल २०२१ रोजी यांच्या सहीनिशी आदेश पारित करून मंजूर करण्यात आला होता. सदर चेंज रिपोर्टला महाराष्ट्र माळी समाज महासंघातील काही मंडळींनी विरोध करत त्यामध्ये चेंज रिपोर्ट खोटा ठरवण्याचा प्रयत्न केला. व वरील श्रीमती रजनी क्षीरसागर यांच्या कोर्टात अपील दाखल केले होते. परंतु पुणे सह आयुक्त श्रीमती. रजनी क्षीरसागर यांनी अतिशय सखोलपणे सदर संस्थेचे कामकाज लक्षपूर्वक तपासणी केली असता दोन्ही बाजूच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतले.
यामध्ये समोरच्या पार्टीला वेळ दिला असता कुठलाही माहिती व पुरावे न दिल्याने मेरिटवर निर्णय देऊन अपील कर्त्यांची अपील डिसमिस करण्यात आली आहे. सदर निर्णयामुळे संपूर्ण वकील क्षेत्रात तसेच धर्मादाय पुणे आयुक्त कार्यालयात श्रीमती रजनी क्षीरसागर यांच्या शिस्तप्रिय कामाचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. एक अभ्यासू सह म्हणून आयुक्त पुणे धर्मादाय कार्यालयाला लाभले असल्याच्या चर्चा सर्वत्र न्यायिक विभागासह सामाजिक क्षेत्रात होतांना दिसून आले आहे. सदर केस संदर्भात कामकाज अभ्यासू हुशार वकील डी.डी.शहा यांनी काम पाहिले आहे.

महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या अध्यक्षपदी श्री. अनिल महाजन यांची निवड नियमानुसार असल्याच्या निकालावर पुन्हा वरील कोर्टाने शिक्का मार्तंब केला आहे. सह आयुक्त पुणे यांनी दि. २५/११/२०२४ रोजी याबाबतचा निकाल दिला आहे.
सन २०१८ मध्ये पुणे असिस्टंट धर्मादाय आयुक्त यांच्याकडे एकूण ११ विश्वस्त यांच्या निवडीच्या चेंज रिपोर्ट सादर करण्यात आला होता. परंतु सभा व चेंज रिपोर्टला महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या काही जुन्या मंडळींनी विरोध दर्शवला होता चेंज रिपोर्ट बाबत आक्षेप घेण्यात आला होता सदर निवड बेकायदा असल्याची मागणी करत दिनांक ०१/०४/२०२१ रोजी पुणे धर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांच्या कोर्टासमोर अपील दाखल करण्यात आली होती परंतु मागील असिस्टंट चॅरिटी कमिशनर राहुल चव्हाण यांच्या समोर कोर्टात मांडण्यात आलेले प्रकरण तसेच अनिल महाजन यांचे कार्य समाज कार्यासाठीची धडपड याबाबतची खातर जमा करून काही साक्षी नोंदवून नाशिक येथील वार्षिक सभेचे इतिवृत्त व पुरावे तपासून न्यायालयाने तक्रार अर्ज फेटाळून लावला होता व त्यावेळी श्री.राहुल चव्हाण यांनी हा चेंज रिपोर्ट मंजूर केला होता. त्याच चेंज रिपोर्टला काही मंडळींनी आक्षेप घेऊन पुन्हा आयुक्त श्रीमति रजनी क्षीरसागर यांच्या कोर्टासमोर अपील दाखल करण्यात आली होती सदर प्रकरणाबाबत रजनी क्षीरसागर यांनी मेरिट वर अतिशय पारदर्शकपणे कागदपत्राची तपासणी करून अभिलेखावरून सर्व नोंदणी पाहून सदर अपीलकर्त्याचे अपील दिनांक २५/११/२०२४ रोजी डीसमिस करण्यात आले आहे.