पाचोर्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सन्मान!

पाचोरा व्हाईस ऑफ मिडिया या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या संघटनेतर्फे पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांचा पुष्पगुच्छ व फोटो फ्रेम देऊन सन्मान करण्यात आला आहे. यावेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे, तहसिलदार विजय बनसोडे, पोलिस निरीक्षक अशोक पवार, एम. एस. पी. बिल्डकाॅनचे संचालक मनोज पाटील, भाजपाचे मधुकर काटे, प्रमोद सोनार, मंत्रायलाचे जेष्ठ पत्रकार अनिल महाजन हे होते.
पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांच्या वतीने निवडणुकीच्या काळामध्ये पत्रकार बांधवांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या स्नेह मेळाव्या दरम्यान भाषण करत असतांना आमदार किशोर पाटील यांनी पत्रकारांविषयी एक खंत व्यक्त केली होती ती म्हणजे मी मागील दहा वर्षांपासून तालुक्याचा आमदार आहे राज्याच्या आणि केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यासाठी काम मी या ठिकाणी करत आहे. गल्ली पासून दिल्ली पर्यंत आपला डंका आहे. परंतु थोडा जरी माझ्या विरोधात आपल्याला काही विषय सापडला तरी आपण तो विषय पत्रकारितेच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणून विषय मार्गी लावतात ही गोष्ट चांगलीच आहे. परंतु एकाही पत्रकार बांधवाला असे वाटले नसावे का की, आपल्या आमदाराचा सत्कार केला पाहिजे! त्या दिवशीच पत्रकार बांधवांच्या वतीने आमदारांना शाश्वती देण्यात आली होती की, येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच आपला जाहीर सत्कार करू आणि त्या अनुषंगाने पाचोरा येथे मधुर खान्देश या स्थानिक वृत्तपत्राच्या वर्धापन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विनायक दिवटे, जेष्ठ सल्लागार लक्ष्मण सूर्यवंशी, पाचोरा तालुका अध्यक्ष नंदकुमार शेलकर, शहर अध्यक्ष प्रविण बोरसे, कार्याध्यक्ष राहुल महाजन, शहर उपाध्यक्ष प्रशांत येवले, शहर सचिव निखिल मोर, तालुका सचिव रविशंकर पांडे, तालुका संघटक चिंतामण पाटील, शहर संघटक दिलीप परदेशी, शहर कार्याध्यक्ष नरसिंग भुरे, सह संघटक जावीद शेख, बाबुलाल पटेल, एम. एस. पाटील यांच्या उपस्थितीत आ. किशोर पाटील यांना राज्याचे तात्कालिक मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या चित्रफिती एकत्रित करुन तयार केलेली सुरेख अशी फोटो फ्रेम व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार अनिल आबा येवले, प्रा. राजेंद्र चिंचोले, दत्ता बोरसे, पत्रकार किशोर रायसाखडा, भुवनेश दुसाने, राजेंद्र खैरनार, संजय एरंडे, नंदु सोमवंशी, प्रमोद सोनार,प्रवीण ब्राम्हणे, किशोर डोंगरे,सुधाकर वाघ, विठ्ठल महाजन तसेच पाचोरा शहरातील विविध सामजिक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल महाजन, सूत्रसंचालन एयाज खान तर उपस्थितांचे आभार शहर अध्यक्ष प्रविण बोरसे यांनी मानले.