दिवंगत मित्राचे स्वप्न केले पूर्ण! शेतकऱ्याने सुरू केला मैत्री मुरघास उद्योग समूह…प्रेरणादायी विशेष बातमी

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पहाण येथील शेतकरी असलेले स्वप्निल नारायण महाजन यांनी त्यांच्या मयत झालेल्या मित्राच्या स्वप्न पूर्ण करून समाजामध्ये एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस असलेला स्वप्निल नारायण महाजन यांनी माणुसकीचे दर्शन घडवत पहाण गावातील अगदी जवळचा मित्र असलेला स्वर्गवासी प्रमोद दत्तू पाटील यांनी मिळून ज्या व्यवसायाचे स्वप्न बघितले होते ते स्वप्न पूर्ण करून आपल्या मित्राला एक आगळीवेगळी श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण केली आहे. यूट्यूब च्या माध्यमातून व्हिडिओ बघून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचा यांचा नेहमीच प्रयत्न असायचा परंतु प्रमोद पाटील यांच्या मागील काळात अपघाती निधन झाले होते. परंतु मयत मित्र आपल्या सोबतच आहे म्हणून मित्राची आठवण आपल्या सोबत कायम राहावी म्हणून त्यांच्या दुचाकी वर कायम “मित्राची आठवण” असे लिहून मैत्री मुरघासच्या माध्यमातून हा सोबती मात्र परिसरात आपल्याला बघायला मिळतो. अतिशय शांत संयमी स्वभावाचे स्वप्निल महाजन हे परिसरातील शेतमजूर पासून यशस्वी मुरघास उद्योजक म्हणून नावारूपाला आले आहे.