नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यातील पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत चोरी! आरोपी ८ तासात जेरबंद


Advertisements
Ad 4

पाचोरा: दिनांक ०७ एप्रिल २०२५ रोजी पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंप्री सार्वे ता. पाचोरा येथील आनंदराव विठ्ठल पाटील यांचे घराच्या पत्री खोलीतून सुमारे ०६ तोळे सोने अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याबाबत पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन भाग ५ गु.र.नं. ८३/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता व सदर गुन्ह्याचे तपासात पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगांव भाग श्रीमती कविता नेरकर,उप विभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. प्रकाश काळे यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी पो.उपनिरीक्षक प्रकाश पाटील, पोलिस कर्मचारी नरेंद्र नरवाडे,अमोल पाटील,नामदेव इंगळे, ईमरान पठाण असे पथक तयार करुन सदरचा गुन्ह्या ऊघडकिस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सदर गुन्ह्यात राजेंद्र किसन पाटील वय ४२ वर्ष रा. सार्वे पिंप्री ता. पाचोरा यांस सदर गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेवुन विचारपुस करुन त्याने सदर गुन्ह्यातील गेला माल १) ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे २) १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नॅकलेस तसेच ३) ०२ चांदीचे पायातील पैंजण असा सुमारे ४,८२,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हा गुन्ह्याचे तपाससकामी जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीतास गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ.नरेंद्र नरवाडे हे करित आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button