नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
ताज्या बातम्या

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये होणारी हेराफेरी थांबणार! ‘एचएसआरपी’अनिवार्य! ‘एचएसआरपी’ प्लेट बसविण्याचे शासनाच्या वतीने आवाहन!


मुंबई: दैनंदिन जीवनामध्ये वाहन चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होतांना दिसून आले आहे. शासनाच्या वतीने याबाबत विशेष खबरदारी म्हणून वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविणे अनिवार्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ०१.०४.२०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या नियमानुसार ०१.०४.२०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनांना बसविण्याचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दि. ०१ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहन धारकांना त्यांच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

 

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्राकरिता मे. रिअल मेझोन इंडिया प्रा. ली. ही एजेंसी निश्चित करण्यात आलेली असून एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकींग पोर्टल https://hsrpmhzone2.in कार्यान्वित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी वरील पोर्टलवर बुकींग करुन त्यांच्या सोईप्रमाणे अपॉईंटमेंट घेवून नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी. वाहनधारक प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीधारक नसला तरी काही कामानिमित्त या कार्यक्षेत्रामध्ये वाहन वापरत असेल तरी देखील वाहनास नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. वाहनधारकांना त्यांच्या वाहनांकर ही नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधीत सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयात दाखल करु शकतात. प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहनधारक व नागरिकांनी त्यांच्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा उतरविणे/ चढविणे, दुय्यम आरसी/ विमा अद्ययावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येणार आहे.

ही नंबर प्लेट नसलेली वाहने, बनावट एचएसआरपी नंबर प्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर सबंधित कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मुंबई (मध्य) यांनी कळविले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button