पाचोरा: सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस स्टेशनला शांतता कमिटीची बैठक संपन्न!

पाचोरा, दि. ११ एप्रिल २०२५ रोजी सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिस स्टेशन येथे पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी चर्चा करण्यात आली. याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक काढणाऱ्या काही मंडळाकडून समस्या प्रशासनाला मांडण्यात आल्या असून त्या प्रशासनाने देखील जाणून घेतल्या आहेत व प्रशासनाच्या वतीने देखील योग्य त्या सूचना व मार्गदर्शन संबंधित विभागांना मिरवणूक संदर्भात देण्यात आल्या आहेत.

बैठकीला पाचोरा शहरातील तमाम भीमसैनिक तसेच सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, पोलिस निरीक्षक अशोक पवार, बांधकाम विभागाचे अभियंता डी. एम. पाटील, महावितरणचे हेलोडे साहेब, पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्यासह पाचोरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. उत्सव साजरा करतांना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन यावेळी अधिकाऱ्यांनी केले. तसेच, नागरिकांनी परस्पर सहकार्याने उत्सव शांततेत साजरा करण्यासाठी योगदान द्यावे, असेही सांगण्यात आले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली असून पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी मानले आहेत.
