पाचोऱ्यात महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त तहसील कार्यालय,पोलिस स्टेशनला प्रतिमा पूजन संपन्न!

पाचोरा, दि. ११ एप्रिल २०२५: थोर समाजसुधारक आणि शिक्षणाचे प्रणेते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज पाचोऱ्यात प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यंदा ११ एप्रिल २०२५ रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी स्थानिक प्रशासकीय कार्यालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आज तहसील कार्यालयात संपूर्ण अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन करण्यात आले असून यामध्ये पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चौकीत प्रतिमा पुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.
तसेच सार्वजनिक फुले स्मारकावर देखील राजकीय,प्रशासकीय विभागांच्या वतीने देखील पुष्पहार अर्पण करण्यात आले आहे. यावेळी महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि जातीभेद निर्मूलनासाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. प्रशासकीय यंत्रणेच्या प्रमुखांनी आपल्या मनोगतात महात्मा फुले यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. “महात्मा फुले यांनी शिक्षण आणि समतेचा पाया रचला, जो आजही आपल्याला प्रेरणा देतो. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला असून सायंकाळी पाचोरा शहरात साहित्य कला जपण्यासाठी कृष्णापुरी जयहिंद लेझिम,क्रीडा मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित गाठोड प्रबोधनाचा कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे देखील अवाहन करण्यात आला आहे.
