माऊली जेष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने पहेलगाम गोळीबार घटनेचा निषेध;पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी!

मधुर खान्देश वृत्तसेवा: दि.२२ एप्रिल रोजी काश्मीर मधील पहेलगाम बसरन खोऱ्यात पाकिस्तान समर्थक दहशतवादी टीआरएफ संघटनेच्या अतिरेक्यांनी भारतीय हिंदू पर्यटकांवर अमानुष गोळीबार करून २८ निष्पाप नागरिकांना त्यांचा धर्म विचारून क्रूरतेने ठार केले. हा प्रकार मानवतेला काळीमा फासणारा असून या घटनेमुळे देशात संताप आहे. पाचोरा येथे माऊली बहुद्देशीय जेष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून पाचोरा उप विभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे आणि पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना निवेदन देण्यात आले. घटनेचा निषेध जेष्ठ नागरिकांच्या भावना केंद्र व राज्य सरकार कडे पाठवून देशात अराजकता, हिंसाचाराला प्रोत्साहन आणि अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला केंद्र सरकारने कायमचा धडा शिकविण्याची मागणी निवेदनात केली आहे.निवेदन देताना ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या अध्यक्ष राजाराम नागो सोनार, छगन पंढरीनाथ पाटील, राजेंद्र त्र्यंबक नागणे, सुधाकर नथू पाटील, रामदास लोटन चौधरी, नाना फकिरा महाजन महाजन, हरि गिरधर बदगुजर लक्ष्मण आबा सूर्यवंशी, शांताराम सुकदेव चौधरी आदीं उपस्थित होते.