जळगाव जिल्हा
बीड सरपंच हत्याकांड प्रकरण! क्रूर,निर्दयी वाल्मीक कराड व इतर आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी,या मागणीचे शिवसेना-युवासेना पाचोरा तर्फे निवेदन.

पाचोरा:आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्य अध्यक्ष पुर्वेशजी सरनाईक यांच्या आदेशाने बीड जिल्ह्यातील मस्केजोग येथील सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आलेल्या क्रूर नराधम वाल्मिक कराड याला फाशीची शिक्षा व्हावी.

यासाठी युवासेनेने उभारलेल्या चळवलीला बळ देण्यासाठी आज दिनांक 04/03/2025 रोजी दुपारी 4.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पाचोरा येथे वाल्मिक कराड याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले असून संबधीत संशयित आरोपींवर योग्य कारवाई करण्यात यावी याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे.