जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोऱ्यात पाच माजी नगरसेवकांची न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता!

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील प्रथमवर्ग न्यायाधीश यांचे न्यायालयात भा.द.वी.कलम १८८ व लोकप्रतिनिधी कायदा कलम १३०,१३६ प्रमाणे चालु असलेल्या खटल्यातुन पाचोरा नगरपरीषदेचे पाच माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी,गंगाराम पाटील,संजय भिल,अविनाश सावळे व कुसुमबाई पाटील यांची आज दि ११ एप्रिल २०२५ रोजी न्यायाधीश श्रीमती जी.एस.बोरा यांनी निर्दोष मुक्तता केली सदर खटला ९ वर्ष असा जुना खटला होता आरोपी तर्फे अँड एस.पी पाटील व अँड.अंकुश कटारे यांनी कामकाज पाहीले तर सरकारी वकील म्हणून ॲड.मीना सोनवणे यांनी कामकाज पाहीले होते.