जळगाव जिल्हा
पाचोरा:विविध समस्यांबाबत जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

पाचोरा येथे दिनांक 4 मार्च 2025 पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मंगेश देवरे यांना ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, एम एम कॉलेज जवळ येथील विविध मागण्यांबाबत निवेदन नगरपालिका कार्यालयात देण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष राजाराम नागो सोनार, सचिव – के.एस. महाजन सर संचालक संतोष दला पाटील,छगन पंढरीनाथ पाटील,, प्रकाश बळीराम महाजन, राजेंद्र सांडू महाजन उपस्थित होते. सदर मागण्यांचे पूर्तता करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी देवरे यांच्यावतीने देण्यात आले आहे.