पाचोरा मुख्याधिकारी देवरेंकडून तक्रारीची तत्काळ दखल! अखेर मुतारीवर बसवले पत्रे.

पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेशजी देवरे यांच्यासह बांधकाम अभियंता भैय्यासाहेब पाटील यांना बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनच्या वतीने पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ पिंपळाचे वटवृक्ष आहेत. त्या पिंपळाच्या झाडांच्या पानांची गळती होवुन ती पिंपळाची पाने सरळ मुतारी मध्ये पडत असतात आणि त्या पिंपळाच्या पानांवर मुतारी मध्ये सतत लघुशंका केली जात असल्यामुळे पिंपळाचे वटवृक्ष हे बहुजन समाजातील अत्यंत पवित्र वटवृक्ष असल्यामुळे पिंपळाच्या वटवृक्षाची सतत पुजा केली ली जाते यामुळे बहुजन समाजातील पिंपळाच्या वटवृक्षाचे पवित्रस्थानी अधिक महत्त्व असल्यामुळे या पिंपळाच्या पानांची विटंबना होऊन धार्मिक भावना दुखावल्या जातील कुठेही अनुचित प्रकार होऊन नये याची जागृत नागरिक म्हणून गंभीर समस्यांचे सविस्तर कथन मुख्याधिकारी यांच्याकडे मांडल्यामुळे कर्तव्यदक्ष जबाबदार अधिकाऱ्यांनी बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या जावु नये यासाठी तात्काळ निर्णय घेवुन छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुतारी वर पत्रे बसविण्याचे तात्काळ आदेश दिले लागलीच पत्रे बसविण्यात आले आहेत.याबाबत सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ तुकाराम पाटील यांनी प्रशासनाचे कौतुक करत आभार मानले आहे.