जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोऱ्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शरबत वाटप संपन्न!

पाचोरा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तसेच सामाजिक कार्यकर्ते गौतम सोनवणे यांचा वाढदिवसानिमित्त हुतात्मा स्मारक या ठिकाणी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्टेशन रोडवरील पुतळ्यावर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व भीम बांधवांना या ठिकाणी शरबत वाटपाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. पाचोरा येथील पत्रकार छोटू भाऊ सोनवणे, युवा कार्यकर्ते गोपाल शेठ,संतोष भाऊ काटकर, अल्ताफ भाऊ,भावेश मोरे, अतुल भाऊ, किरण पवार, शोएब भाऊ,अन्वर शेख,गौतम साळवे,आबा भाऊ दशरथ सोनवणे यांनी परिश्रम घेत कार्यक्रम संपन्न केला आहे.