जळगाव जिल्हाराज्य
महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना ऑनलाइन विज बिल भरा आणि जिंका बक्षिसे! पाचोऱ्यातील ग्राहकांना मिळाले मोबाईल

पाचोरा: महाराष्ट्र शासनाच्या महावितरण कंपनीच्या वतीने आता ऑनलाईन विज बिल भरणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून बक्षीस वितरण करण्यात येणार असून पुढील दोन महिन्यांपर्यंत ही योजना राबवण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती महावितरण कंपनीच्या पाचोरा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. यामध्ये पाचोरा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कार्यालयाअंतर्गत दहा ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना मोबाईल स्मार्टफोन वितरित करण्यात आला तर पाच ग्राहकांना स्मार्टवॉच देण्यात आली आहे. ऑनलाइन विज बिल भरणाऱ्या ग्राहकांना अचानकपणे अशा पद्धतीने बक्षिसे मिळाल्याने आनंद व्यक्त करण्यात आला आहे.