पाचोरा तालुक्यातील सिक्युरिटी गार्डने ४९ रुपयात कमविले ३ कोटी, एक थार गाडी तर अजून बरेच काही….

मधुर खान्देश वृत्तसेवा: मुंबई-सध्या ड्रीम इलेव्हन गेमच्या माध्यमातून सर्वत्र ऑनलाईन धुमाकूळ घातलेला आहे. यामध्ये अनेक मंडळी पैसे लावून आपले आप आपल्या परीने नशीब आजमावण्याचे प्रयत्न करतात. गेसिंग च्या माध्यमातून हा गेम खेळला जातो त्यामध्ये काहीना यश तर काहींना अपयश हाती येते. परंतु जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहटार गावातील रहिवासी असलेला शेतकऱ्याचा मुलगा तसेच कल्याणी येथे सेक्युरिटी गार्डचे काम करणाऱ्या अक्षय परदेशी नामक युवकाने ऑनलाईन गेम च्या माध्यमातून तीन कोटी रुपये जिंकले असून एक महिंद्रा थार गाडी व रेनॉल्ट कंपनीची टायगर अशा दोन गाड्या व १० ग्रॅम सोने देखील मिळणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यामध्ये आपण आपला परिवारासह चांगल्या पदावर पोहोचून चांगलं नावलौकिक करावं अशी स्वप्न असतात ते कुठल्या माध्यमातून का होईना अशाच प्रकारे या युवकाने ड्रीम इलेव्हन ऑनलाईन गेम च्या माध्यमातून तीन करोड रुपये जिंकून पुढील आयुष्यभराची कमाई एकदाच करून अनेकांना धक्का दिला आहे.
