मुली प्रियकरासोबत निघून जाण्याचे वाढते प्रमाण बघता देहू-आळंदीच्या लग्न लावून देणाऱ्या संस्थांवर पायबंद लावण्याची गरज!
देशात आणि राज्यात आजकाल समाजात एक नवीन ट्रेंड दिसून येत आहे तो म्हणजे मुली आपल्या प्रियकरासोबत घर सोडून जाण्याचे प्रमाण वाढत आहे. दररोज अनेक पोलिस स्थानकात मुलींच्या मिसिंग बाबत तक्रारी दाखल होतांना दिसून आल्या आहेत. हे पळून गेलेले जोडपे विशेषत: देहू आणि आळंदी सारख्या धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी, जिथे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या विचारांनी समाजाला दिशा दिली या ठिकाणी अनेक धार्मिक संस्था आणि मंदिरे विवाह लावून देण्याचे काम करतात, ज्यामुळे काहीवेळा कायदेशीर आणि सामाजिक प्रश्न निर्माण होतात. अश्या ह्या या वाढत्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार या संस्थांवर पायबंद घालणार का? वाढत्या घटनांचे सामाजिक परिणाममुली प्रियकरासोबत निघून जाण्याच्या घटनांमागे अनेक कारणे असू शकतात त्यामध्ये प्रेम, घरच्यांचा विरोध, सामाजिक दबाव, किंवा आर्थिक परिस्थिती परंतु, यामुळे कुटुंबांमध्ये तणाव, सामाजिक कलह आणि काहीवेळा कायदेशीर गुंतागुंत निर्माण होते. देहू-आळंदी येथील काही संस्था, ज्या जलद विवाह लावून देण्यासाठी प्रसिद्ध आहेत, अशा जोडप्यांना आश्रय देतात. मात्र, यामुळे काही गंभीर प्रश्न उद्भवतात विवाह करणाऱ्या जोडप्यांचे वय, त्यांची संमती, आणि कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता याकडे पुरेसे लक्ष दिले जाते का? जर नाही, तर या संस्था अनावधानाने बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देत नाहीत का?संस्थांवर नियंत्रणाची गरजदेहू-आळंदी येथील धार्मिक संस्थांनी सामाजिक सुधारणांचे केंद्र बनणे अपेक्षित आहे. संतांनी शिकवलेला समता, नीती आणि धर्माचा मार्ग या संस्थांनी अंगीकारायला हवा फक्त पैसे कमविण्याचा या संस्थांचा धंदा बनला असेल तर या संस्थांवर बंदी घातलीच पाहिजे. प्रेम विवाह करतांना आई,वडील,भाऊ व मामा यांच्या संमतीचा कायदा आल्यास प्रेम विवाह कर्मचारी प्रमाण आई वडिलांच्या संमतीने होण्यास सुरुवात होईल यामध्ये समाजात दोन परिवारांमध्ये ज्याप्रमाणे वाद निर्माण होण्याचे काम सुरू आहे यावर नक्कीच पायबंद लागून मुली घरातून निघून जाण्याच्या प्रकारास आळा बसू शकतो असे माझे स्पष्ट मत आहे.